
नागपूर – नुकत्याच झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. त्यानंतर ५ डिसेंबरला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर १५ तारखेला ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. पण अद्याप त्यांना मंत्रीपद देण्यात आलेले नाही.

खातेवाटपाबाबत महायुतीमधील घटक पक्षात जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसापासून खातेवाटप रखडले आहे. महायुतीमधील तीन पक्षातील चुरस पाहता अधिवेशन संपल्यानंतरच राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला मुहूर्त लागण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण अशातच एक पत्र व्हायरल होत असून त्यात मंत्रीपदाचे वाटप करण्यात आल्याचे दिसत आहे. पण पुर्ण यादी नसल्याने ही यादीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे.

संभाव्य खातेवाटप
कॅबिनेट मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे – उर्जा
राधाकृष्ण विखे पाटील – महसूल
हसन मुश्रीफ – कृषी
चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्र शिक्षण
गिरीश महाजन – आरोग्य व कुटुंब कल्याण
गुलाबराव पाटील – जलसंपदा
गणेश नाईक – कामगार
दादा भुसे – पर्यावरण
संजय राठोड – आदिवासी विभाग
धनंजय मुंडे – सहकार व वस्त्रोद्योग
मंगलप्रभात लोढा – गृहनिर्माण
उदय सामंत – उद्योग
जयकुमार रावळ – पर्यटन व सांस्कृतिक
पंकजा मुंडे – सामाजिक न्याय
अतुल सावे – अल्पसंख्याक विकास
अशोक उईके – पशुसंवर्धन
शंभूराज देसाई – सार्वजनिक बांधकाम
आशिष शेलार – अर्थ व नियोजन
दत्ता भरणे – अन्न व नागरी पुरवठा
आदिती तटकरे – महिला व बालकल्याण
राज्यमंत्री
माधुरी मिसाळ – कृषी व संशोधन
आशिष जयस्वाल – ऊर्जा
पंकज भोयर – नगरविकास विभाग
मेघना बोर्डीकर साकोरे – जलसंपदा
इंद्रनील नाईक – शालेय शिक्षण
योगेश कदम – पशुसंवर्धन व दुग्ध विकास
(ही यादी अधिकृत आहे याची कोणतीही पुष्टी नाही)










