मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यक्रमाला जाणाऱ्या महिलांच्या बसचा भीषण अपघात ; काही महिला जखमी, बघा काय घडले नेमके?

रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचा तिसऱ्या टप्प्यातील शुभारंभ आज रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जाणाऱ्या महिलांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे.

माणगावमधील धनसे क्रीडांगणावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाची तयारीदेखील सुरु झाली आहे. यासाठी लाडक्या बहिणींना आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या हजारो बसेस या रायगड जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये महिलांना घेऊन येत आहेत. यादरम्यान श्रीवर्धन तालुक्यातील काही महिलांना घेऊन येत असताना एका बसचा मांजरोने घाटामध्ये भीषण अपघात झाला आहे.

यामध्ये काही महिला जखमी झाल्या आहेत. ही बस म्हसळा येथून माणगावकडे येतं असताना बाजूच्या दरीत घसरल्याने हा अपघात झाला आहे. जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने महिला या अपघातामध्ये कोणीतीही जीवीतहानी झालेली नाही. एसटी घेऊन गेलेलं चालक हे नवीन असल्याने मुख्य वळणाचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात झाला. जवळजवळ २० फूट खोल दरीमध्ये ही बस कोसळली आहे.