लोणी काळभोर प्रतिनिधी – चंद्रकांत दुंडे : कडक उन्हाळ्यामुळे मेंढपाळांमध्ये चाराटंचाईचे संकट आधिकच गडद होत चालले आहे.जुन्या कालव्याला झालेले अस्तरीकरण यामुळे पाणी पाझरणे बंद झाले आहे परीणामी कालव्याच्या कडेने गवतसुद्धा उगवत नाही.पाणिटंचाईमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी जमिनी नांगरट करुन तापत ठेवल्या आहेत याचाही फटका मेढपाळ बांधवांना बसत आहे. भाजीपाला काढुन गेल्यानंतर काही शेतकरी शेतात बकरी सोडण्यास सांगतात तेवढा एकमेव आधार स्थानिक धनगर समाजाच्या मेंढपाळांना आहे.परंतु काही शेतकरी तणनाशकाचा वापर करुन शेती गवतमुक्त करतात.काही शेतकरी रोटाव्हेटरच्या वापराने शेती तणमूक्त करतात याचाही फटका मेंढपाळांना बसत आहे.
मेढपाळांची संपत्ती म्हणजे त्यांच्या पाळीव शेळ्या ,मेंढ्या,गाया.परंतु या मोठ्या दुष्काळात त्यांचा चारा पाण्याचा प्रशन गंभीर होत चालला आहे.पशुधन जगवायचे कसे हा प्रश्न मेंढपाळ बांधवांना सतावत आहे.तसेच मेढपाळ बांधव दिवसभर बकरी चारुन रात्री शेतकऱ्यांच्या शेतात बकरी बसवत असतात.शेतकऱ्यांना त्यापासून खत मिळते व मेढपाळांना बसक म्हणून मेढ्यांच्या संख्येनुसार बसक मिळते त्यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो.परंतू चारा नसल्याने त्याचा परिणाम खताच्या उपलब्धतेवर होत असल्याने शेतकरी शेतात बकरी बसवत नसल्याने कोठेतरी मोकळ्या जागेत किंवा प्लाॅठींगमध्ये बसावे लागत असल्याने उत्पन्न नसताना खर्च करण्याची वेळ मेढपाळ बांधवांवर आली आहे.तसेच कुटुबांचा खर्च चालवणे कठीण बनल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर धनगर बांधवांनी आपली कैफियत थोडक्यात सांगितली.तरी शासनाने आम्हाला चाराटंचाईमध्ये मदत करावी अशी मागणी केली आहे.