दोघेही एकत्र स्पाॅट झाल्याने चर्चांना उधान, ब्रेकअपनंतर अभिनेत्री पुन्हा प्रेमात, महाराष्ट्र कनेक्शन समोर
मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेता वीर पहारिया यांच्या रिलेशनशिपची चर्चा मनोरंजन विश्वात रंगू लागल्या आहेत. या दोघांनाही एकत्र डिनर डेट्सवर पाहिल्यापासून त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण अद्याप याला अधिकृत मान्यता मिळालेली नाही.
तारा सुतारियाची लव्ह लाइफ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. अगोदर तारा ही करीना कपूरचा आतेभाऊ आदर जैन बरोबर चार वर्ष रिलेशनमध्ये होती. पण आता ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीरसोबत रिलेशनमध्ये आल्याची चर्चा रंगली आहे. तारा ही अभिनेता वीर पहारिया याला डेट करत आहे. तारा आणि वीरने काही महिन्यांपूर्वीच एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आहे. दोघंही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच तारा आणि वीर एका फॅशन वीकमध्ये एकत्र दिसले होते. विशेष म्हणजे या शोमध्ये ते दोघंही शोस्टॉपर होते. त्यानंतर त्यांना एकत्र डिनर डेटवरही अनेक वेळा पाहिलं गेलं आहे. त्यामुळे ही चर्चाच अधिक वाढली आहे. मात्र, अद्याप या नात्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. वीरने नुकतेच अक्षय कुमारसोबत ‘स्काय फोर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याआधी वीरचं नाव सारा अली खान आणि मानुषी छिल्लरसोबत जोडलं गेलं होते. दुसरीकडे, तारा सुतारियाचे नाव अभिनेता अरुणोदय सिंह यांच्यासोबत जोडले गेले होते, परंतु ताऱ्याने एका मुलाखतीत स्वतःला सिंगल असल्याचे स्पष्ट केले होते आणि अरुणोदयला आपला चांगला मित्र म्हटले होते. तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांच्या नात्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तथापि, त्यांच्या एकत्रित उपस्थितीमुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. प्रेक्षक आणि चाहत्यांना त्यांच्या नात्याबद्दल अधिक माहिती मिळण्याची उत्सुकता आहे. महत्वाचे म्हणजे तारा सुतारियाने फार कमी वेळात हिंदी चित्रपटसृष्टीत आपला खास ठसा उमटवला आहे.
तारा सुतारिया ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने ‘स्टुडंट ऑफ द इअर 2 या चित्रपटातून २०१९ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘मरजावां’ आणि ‘तडप’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने आपली छाप पाडली. तर वीर आपला जम बसवू पाहत आहे.