‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला सोन्याच्या तस्करीप्रकरणी अटक

दुबईवरुन १४ किलो सोन्याची तस्करी, १२ कोटींचे सोने जप्त, येथे लपवले होते सोने

बंगळूर – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रान्या राव हिला बंगळुर विमानतळावरून सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. रान्या राव दुबईहून परतत असताना ही कारवाई करण्यात आली.

रान्या राव ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने कन्नड आणि तामिळ भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती दुबईवरुन परतत असताना तिच्याकडे तब्बल १४.८ किलो सोनं आढळून आलं. या सोन्याची किंमत जवळपास १२ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. रान्या रावला ३ मार्च रोजी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर तिला आर्थिक गुन्हे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी तिला १४ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. रान्या राव ही डायरेक्टर ऑफ जनरल पोलीस (हाऊसिंग) रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. तिनं कथितपणे तिच्या कपड्यात सोनं लपवलं होतं, अशी माहिती आहे. रान्या प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री आहे. सध्या या प्रकरणाची पूर्ण चौकशी सुरु आहे. रान्याची देखील चौकशी करण्यात येणार आहे.

रान्या रावने २०१४ साली ‘मानिक्य’ या प्रसिद्ध कन्नड चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. तिने आत्तापर्यंत सुदीप,विक्रम प्रभू , गणेशबरोबर काम केले आहे. पण वर्षांपासून रान्या राव ही सिनेसृष्टीपासून दूर होती. गेल्या काही दोन वर्षात तिने एकाही चित्रपटात भूमिका साकारली नाही.