
रूग्णालयात उपचार सुरु, समृद्धी महामार्गावर अपघात, पुढचे काही तास महत्वाचे

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याची पत्नी सोनाली सूद कार अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना मुंबई-नागपूर महामार्गावर आज पहाटे घडली. पत्नीच्या अपघातानंतर अभिनेता सोनू सुद नागपूरला पोहोचला आहे.

अभिनेता सोनू सूदची पत्नी आपल्या कुटुंबासोबत मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होती. दरम्यान हा प्रवास करत असताना तिच्या गाडीला अपघात झाल्याच समोर येत आहे. यामध्ये ती जखमी झाली आहे. दरम्यान तिच्यावर नागपूरच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अभिनेता सोनू सूद तातडीने नागपूरकडे रवाना झाला आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. सोनाली आणि तिचा भाचा दोघांनाही तातडीने नागपूरच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. ४८ ते ७२ तास डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार आहेत. अभिनेत्याच्या प्रवक्त्यानेही या वृत्ताला दुजोरा देत म्हटले आहे की, “हो, सोनालीचा अपघात झाला आहे. सोनू सध्या उपलब्ध नाही.” दरम्यान सोनू सूदची पत्नी सोनाली सूद हिचा अपघात झाल्याची माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली आहे. पण तिची प्रकृती चिंत्ताजनक नसल्याचे देखील सांगितले आहे.
सोनू सूदने १९९६ मध्ये सोनालीशी लग्न केले. सोनाली सूद ही मूळ आंध्र प्रदेशमधील रहिवाशी आहे. सोनू सूद आणि सोनाली सूद यांना दोन अपत्य आहेत. ती देखील एक प्रसिद्ध चित्रपट निर्मिती आहे. सोनाली सूद लाइमलाइटपासून दूर राहते, ती सोनू सूदच्या सामाजिक कार्यांमध्ये मदत करते.










