अमेरिकेच्या वाढीव टॅरिफबाबत फडणवीसांची उच्चस्तरीय बैठक

टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार, निर्यातदार धास्तावले, या महत्वाच्या मुद्द्यांवर प्राथमिक चर्चा

मुंबई – अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत जीडीपी, रोजगार, वाणिज्य आदी महत्वाच्या मुद्द्यांवर प्राथमिक चर्चा करण्यात आली.

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे राज्यातील निर्यातप्रधान उद्योगांवर संभाव्य परिणाम, तसेच जागतिक बाजारातील स्पर्धात्मकतेवर होणारे परिणाम याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील उद्योगांचे हित आणि अर्थव्यवस्था बळकट ठेवण्यासाठी केंद्र सरकारशी तातडीने समन्वय साधून आवश्यक उपाययोजना आखण्यातयेतील. या अनुषंगाने केंद्र सरकारकडून मार्गदर्शन घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. राज्यातील उद्योगांचे हित जोपासण्यासाठी आणि अर्थव्यवस्था बळकट ठेवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. अमेरिकेने भारतीय उत्पादनावर सुरुवातीला २५ टक्के टॅरिफ लावला. त्यानंतर त्यात वाढ करत आणखी २५ टक्के वाढवले. त्यामुळे भारतीय निर्यातदारांमध्ये खळबळ उडाली आहे. कारण अमेरिकेत भारताची १०० रुपयांची वस्तू आता १५० रुपयांना विकली जाणार आहे. त्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी आपोआप कमी होईल. त्याचा फटका निर्यातदारांना बसणार आहे.

ट्रम्प यांनी टॅरिफ लादल्यानंतर वॉलमार्ट, अमेझॉन, टार्गेट व गॅप यांसारख्या प्रमुख अमेरिकन किरकोळ विक्रेत्या कंपन्यांनी भारतातील त्यांच्या ऑर्डर्स रोखल्या आहेत. भारतीय निर्यातदारांना ज्या गोष्टीची काळजी सतावत होती तेच आता घडू लागलं आहे. आता भारत सरकार बरोबर राज्य शासन देखीला पावले उचलताना दुसरा आहे.