महाकुंभमेळ्यात मिळाले होते किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पद, महंतांमध्येच जोरदार खडाजंगी?
प्रयागराज- प्रयागराज मध्ये होत असलेला महाकुंभमेळा रोजच वेगवेगळ्या घटनांमुळे चर्चेत येत आहे. आताही तो चर्चेत आला आहे. कारण प्रयागराजमध्ये होत असलेल्या महाकुंभमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णीने संन्यास घेतला होता. पण त्यातच. आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
ममता कुलकर्णीने संन्यास घेतल्यानंतर तिला किन्नर अखाड्याचं महामंडलेश्वर पद देण्यात आले होते. यावरून अनेकांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे ममताला या महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलं आहे. सोबतच आचार्य महामंडलेश्वरच्या पदावरुन लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना देखील काढून टाकण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच ममताचा पट्टाभिषेक पार पडला होता. त्यानंतर तिला महामंडलेश्वर बनवण्यात आलं होतं. पण वाढता विरोध पाहता किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला पदावरून बरखास्त केले आहे. दरम्यान डोक्यावरचे केस न कापल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान देशद्रोहाची आरोपी ममता कुलकर्णीला आखाड्यात समाविष्ट करून तिच्या नकळत तिला महामंडलेश्वर बनवले होते. असे दास म्हणाले आहेत. तर दुसरीकडे, आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी म्हणतात की, अजय दास हे कोणतेही पद भूषवत नाहीत. त्याला यापूर्वीच रिंगणातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे एका नवीन वादाची सुरूवात झाली आहे.
https://www.instagram.com/mamtakulkarniofficial____?igsh=M2Q1b2FnYWRyZ2Zo
प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीने २५ वर्षांनी भारतात येताच महाकुंभमेळ्यात हजेरी लावली होती. तसेच पिंडदान करत संन्यास घेतला होता. त्यानंतर एका पट्टाभिषेक कार्यक्रमात तिला किन्नर अखाड्याचं महामंडलेश्वर बनवण्यात आले. महामंडलेश्वर बनल्यानंतर ममताला श्री यमाई ममता नंदगिरी असे नाव देण्यात आलं होते.