बीड जिल्ह्यात खळबळ; माजी मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला

रात्रीचे नऊ वाजले होते. रात्रीच्या अंधारात एक व्यक्ती घराच्या समोर उभी होती. इतक्यात दोनजण दुचाकीवरून आले अन् काही कळण्याच्या आतच त्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला. कोयत्याने मानेवर सपासप वार केले.

मात्र पीडित व्यक्तीने हा हल्ला चुकवण्याचा प्रयत्न केला खरा पण त्याला तितकंस यश आलं नाही. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून माजी मंत्री सुरेश नवले यांचे पिए आहेत. माजी मंत्री सुरेश नवले यांचे पिए ललित अब्बड यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ललित अब्बड यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. दुचाकीवरून येत दोघांनी ललित अब्बड यांच्यावर हल्ला केला. कोयत्याने त्यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र या हल्ल्यातून ललित अब्बड थोडक्यात बचावले आहेत. अज्ञात दोन जणांनी चढविलेल्या हल्ल्यात ललित अब्बड यांच्या हाताला मार लागला आहे. माजी मंत्र्यांना पीएवर हल्ला झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ललित अब्बज यांना तातडीने बीड जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं ललित अब्बड यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी बीड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललित अब्बड यांच्यावर कुणी हल्ला केला? याचा पोलीस शोध घेत आहेत. हा हल्ला कुणी केला? यामागचा हेतू काय होता? याचा शोध पोलीस घेत आहेत.