झेंडे वेगळे असले तरी दु:ख मात्र सारखंच दिसतं

Oplus_131072

पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या माजी पत्नीची भावनिक पोस्ट, ‘ऑपरेशन सिंदूर’चेही केले काैतुक

हैद्राबाद – भारताची माजी टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने ‘ऑपरेशन सिंदूर’मधील दोन महिला अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. आता तिने पुन्हा एकदा पोस्ट करत लक्ष वेधले आहे.

ऑपरेशन सिंदूरबाबत सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासमवेत ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयी माहिती दिली होती. हा फोटो पोस्ट करत तिने हा फोटो परफेक्ट आहे, आपण देश म्हणून काय आहोत हे दाखवणारा आहे.. अशा आशयाची पोस्ट केली होती. आता भारत आणि पाकिस्तानदरम्यान पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून शांततेचा संदेश दिला आहे. ती म्हणाली की, “Diplomacy isn’t weakness. Peace isn’t a luxury. It’s the only way forward…” या ओळी लिहित सानियाने युद्ध नव्हे तर संवाद आणि शांती हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. कारण आपण escalation (संकट वाढवणं) काय करतं ते पाहिलं आहे. गाझापासून इस्रायलपर्यंत, पुलवामापासून पहलगामपर्यंत, रशियापासून युक्रेनपर्यंत – झेंडे वेगळे असले तरी दु:ख मात्र सारखंच दिसतं.” या वाक्यांतून तिने युद्धाच्या वेदना कोणत्याही देशात सारख्याच असतात, हे अधोरेखित केलं आहे. तिची ही पोस्ट व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टवर समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

सानिया मिर्झा ही भारतीय टेनिसमध्ये महत्त्वाची ओळख असून ती पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकची घटस्फोटीत पत्नी आहे. सानियाने २०१० मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसह लग्न केले होते. मात्र, २०२३ मध्ये त्यांच्या घटस्फोट झाला. सानिया आणि शोएब मलिकला एक मुलगा असून त्याचे नाव इजहान आहे.