नागपंचमी दिवशी सोने महाग झाले की स्वस्त?

सोन्याची उसळी की आपटी, जाणून घ्या आजचे दर, चांदीची झळाळी कायम

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून आपण बघितले की सोन्या-चांदीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत होती व त्यामुळे सोने-चांदी खरेदीदारांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले होते. परंतु गेल्या दोन ते चार दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात काहीशी घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

आज 29 जुलै 2025 वार मंगळवार असून बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार बघितले तर देशात दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 98 हजार 140 रुपये असून 22 कॅरेटच्या दहा ग्रॅम सोन्यासाठी 89 हजार 962 रुपये आज मोजावे लागणार आहेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे चांदीच्या दरात देखील काहीशी घसरण झाली असून चांदीचे दर आज प्रति दहा ग्रॅम 1136 रुपये तर प्रति किलो दर हा 1 लाख 13 हजार 580 रुपये इतका आहे. मुंबईला आज 22 कॅरेट सोन्याचे दर प्रतिदहा ग्राम 89 हजार 797 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचे प्रति दहा ग्रॅमचे दर 97 हजार 960 रुपये इतके आहेत. पुण्याला आज 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर 89 हजार 797 असून 24 कॅरेटच्या एक तोळ्याचा दर आज 97 हजार 960 रुपये आहे. सोन्याच्या किमतीत घसरण होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिका आणि युरोपियन युनियनमधील नवीन व्यापार करार. या कराराअंतर्गत, अमेरिकन बाजारपेठेत युरोपियन वस्तूंवर १५% शुल्क आणि अमेरिकन उद्योगात युरोपियन युनियनची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावर चर्चा आहे. अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळेही सोन्याच्या किमतींवर दबाव येत आहे.

सोने हे सदा-सर्वकाळ गुंतवणुकीचे मोठे साधन आहे. सोन्याने एकाच वर्षात तीस टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. त्यामुळे सोन्याचा मागील इतिहास पाहता सोन आगामी काळातही वाढणार असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. असे असतानाच आज सोन्याचे भाव मात्र घसरल्याचे चित्र आहे.

टीप- सोन्याचे दर शहर आणि करानुसार बदलत असतात. बातमीतील दर संबंधित दुकानात असेलच असे नाही