
एप्रिल महिन्यात एवढ्या दिवस बँका राहणार बंद, सुट्ट्यांची यादी जाहीर, बघा

दिल्ली – आज आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने बँका चालू राहणार आहेत. पण त्याचवेळी बँकांची एप्रिल महिन्यातील सुट्ट्यांची यादी समोर आली आहे. एप्रिलमध्ये १६ दिवस बँका बंद आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे. यात आठवड्यातील सुट्ट्या आणि सार्वजनिक सुट्ट्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात विविध राज्यांमध्ये सर्व खाजगी, सार्वजनिक, सहकारी आणि इतर बँका १६ दिवस बंद राहतील. यात रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. या महिन्यात गुड फ्रायडे, आंबेडकर जयंती, महावीर जयंती यासारखे सण आहेत. त्यांमुळे बॅंका बंद असणार आहेत. सुट्ट्या असल्या तरीही ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल पेमेंट सुविधा सुरु राहणार आहे. यामुळे अनेक आर्थिक कामे करता येणार आहेत.
सुट्टी यादी
१ एप्रिल – नवीन आर्थिक वर्ष
५ एप्रिल – बाबू जगजीवन राम जयंती
१० एप्रिल – महावीर जयंती
१४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
१५ एप्रिल – आरबीआयच्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याअंतर्गत बंगाली नववर्ष, हिमाचल दिन आणि बोहाग बिहू
१६ एप्रिल – आसामी नवीन वर्षाची सुरुवात
१८ एप्रिल – गुड फ्रायडे
२१ एप्रिल – गदिया पूजा
२९ एप्रिल – भगवान परशुराम जयंती
३० एप्रिल – बसव जयंती/अक्षय तृतीया









