तुम्ही जिओचे कार्ड वापरता का? मग ही बातमी वाचा

जिओची मोठी घोषणा, ग्राहकांवर काय होणार परिणाम?, उद्यापासून हे बदल होणार

मुंबई – रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असून जिओचा युजरबेस हा सर्वात मोठा आहे. जिओने जुलै महिन्यात आपल्या रिचार्ज प्लानच्या दरात वाढ केली आणि युजर्सला एक मोठा धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा जिओने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे.

मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील कोट्यवधी मोबाइल युजर्स जिओशी जोडलेले आहेत. आता जिओने पुन्हा एकदा आपल्या एका रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवली आहे. जिओचा हा नवा प्लॅन २३ जानेवारीपासून लागू होणार आहे. जिओने आपल्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. हा प्लान जिओचा पोस्टपेड प्लॅन असून त्याची किंमत १९९ रुपये आहे. जिओने प्लॅनची किंमत १०० रु . वाढवून २९९ रुपये केली आहे. जिओच्या २९९ रुपयांच्या नवीन पोस्टपेड प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, जिओच्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला अमर्यादित मोफत कॉलिंगचा फायदा मिळतो. यासोबतच, तुम्हाला दररोज १०० मोफत एसएमएसचा फायदा देखील मिळतो. डेटाबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला एकूण ३० जीबी डेटा मिळतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 5G अमर्यादित डेटाचा लाभ देखील मिळतो. दरम्यान जिओने या रिचार्ज प्लानच्या किमतीत करण्यात आलेल्या वाढीमागचं नेमके कारण काय आहे? याबाबत अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.

महत्वाचे म्हणजे हा प्लॅन फक्त जुन्या ग्राहकांसाठी सुरू राहील. तर नवीन जिओ पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी सर्वात स्वस्त प्लॅन ३४९ रुपयांचा असेल ३४९ रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये यूजर्सना ३०जीबी 5G डेटा मिळतो. यासोबतच भारतभर मोफत अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० मोफत SMS देखील उपलब्ध आहेत.