
३१ मार्च अगोदर करुन घ्या हे काम, नाहीतर होईल दंड , सरकारने काढला नवीन नियम, कोणता तो पहा?

दिल्ली – देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणे बंधनकारक केले होते. पण या अगोदरच्या वाहनांना देखील अशी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. यासाठी ३१ मार्चची मुदत दिली आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी) बसवण्याची तरतूद आहे. याबाबतचा आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०१८ मध्येच दिले होते. हाय सिक्युरिटी नंबरप्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार केल्या आहेत. ही प्लेट होलोग्राम स्टिकरसह येते. त्यावर इंजिन आणि चेसिस क्रमांक लिहिलेला असतो आणि हा नंबर प्रेशर मशिनद्वारे लिहिला जातो. हाय सिक्युरिटी नंबरप्लेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ती एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही. यासोबतच ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. कोणीही त्याची कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही. त्याची चोरी व गैरवापर करता येत नाही. २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वीच हा निर्णय झाला असून त्यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी राज्यभरात तीन खासगी एजन्सींची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांना ऑनलाइन प्रक्रिया करून तसेच आपल्या शहरातील असलेल्या अधिकृत केंद्रामध्ये ती बसवून घेता येणार आहे. ३१ मार्चपूर्वी सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर बसवण्याची मुदत असून त्यानंतर जी वाहने ही नंबर प्लेट बसवणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे शुल्क दुचाकी वाहनांसाठी ४५० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये, कारसाठी १ हजार १०० रुपये व ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये आहे.

हाय सिक्युरीटी नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर या कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी, असेही परिवहन कार्यालयाने कळविले आहे.









