या अभिनेत्रीने होणाऱ्या सासऱ्यांनाच बोलावले नाही लग्नाला?

लग्नानंतर दिले हे स्पष्टीकरण, नवरदेवासाठीची ती पोस्ट चर्चेत, सासू होती मोठी अभिनेत्री

मुंबई – दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील व अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा अभिनेता प्रतीक बब्बर लग्नबंधनात अडकला आहे. आज, १४ फेब्रुवारीला प्रतीकने गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. यावेळी लग्नात कुटुंबीयांना न बोलावल्यामुळे बरीच चर्चा झाली. अखेर यावर खुलासा करण्यात आला आहे.

प्रतीकने वडील राज बब्बर आणि त्यांच्या कुटुंबातील कोणालाही लग्नाचे आमंत्रण दिले नव्हते. यामागचे कारण प्रतीकच्या बायकोने प्रिया बॅनर्जीने दिले आहे. कुटुंबातील असा कोणताही सदस्य नव्हता जो लग्नात सामील झाला नाही. तरी देखील लग्नाला कुटुंबातील सदस्य उपस्थित नव्हते अशा अफवा का पसरवल्या जात आहेत हे मला कळत नाही. माझे आईवडील, प्रतीकला सांभाळणारी त्याची काकू, त्याचे आजी-आजोबा आणि कुटुंबातील सर्व महत्त्वाचे लोक लग्नात आमच्यासोबत होते. आमच्या कुटुंबातील असा कोणताही सदस्य नव्हता जो लग्नाला उपस्थित राहिला नाही, असा दावा प्रियाने केला आहे. तसेच प्रिया बॅनर्जीने सोशल मीडियावर नुकतेच लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. “मी प्रत्येक जन्मात तुझ्याशीच लग्न करेन”, असं कॅप्शन लिहित प्रियाने लग्नातील खास क्षण शेअर केले आहेत. लग्नासाठी दोघांनी खास ऑफ व्हाइट रंगाचा पेहराव केला होता. प्रियाने लेहेंगा तर प्रतीकने शेरवानी घातली होती. दोघं या पेहरावात खूपच सुंदर दिसत आहेत. दरम्यान प्रतीक बब्बरचे हे दुसरे लग्न आहे. त्याचे पहिले लग्न २०१९ ला सान्या सागरशी झाले होते. परंतु २०२३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

https://www.instagram.com/p/DGDcqLMtDUh/?igsh=MTgxcnNrd3J0cDNzaA==

प्रिया हिच्याबद्दल सांगायचं झाल तर, ती देखील अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये प्रियाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण अद्यापही प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करु शकलेली नाही. पण विविध माध्यामातून ती कोट्यवधींची कमाई करत आहे.