बॉलीवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप उरकले लग्न?

या कोरियोग्राफरने फोडले लग्नाचे गुपित, या ठिकाणी उरकले लग्न, कोण आहे पती? काय करतो?

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीने तिचा प्रियकर टोनी बेगबरोबर कॅलिफोर्नियामध्ये गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर येत आहे. अलीकडेच तिला मुंबईतील एका कार्यक्रमात पाहिले गेले. परंतु, अभिनेत्रीने अद्याप काहीही अधिकृत केलेले नाही.

मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरमध्ये एका कार्यक्रमासाठी पोहोचली तेव्हा फराह खानने तिच्या लग्नाचे गुपित उघड केले. पापाराझींसमोर फराहने टोनीला तुझ्या पत्नीच्या बाजूला उभा राहा असे सांगितले, त्यामुळे लग्नाची चर्चा सुरू झाली. फराह पापाराझींसमोर पोज देत होती. नर्गिसही तिथे आली आणि तिच्याबरोबर उभी राहिली आणि मग मागून टोनीही आला. त्याला पाहून फराहने नर्गिसकडे बोट दाखवले आणि म्हणाली की, तू तुझ्या पत्नीबरोबर उभा राहा. हे ऐकून अभिनेत्री हसली. नर्गिसने या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिचा प्रियकर आणि अमेरिकन उद्योगपती टोनीशी लग्न केल्याचे वृत्त आहे. लग्न करण्यापूर्वी दोघांनी सुमारे तीन वर्षे एकमेकांना डेट केले होते. कॅलिफोर्नियातील एका आलिशान हॉटेलमध्ये खाजगी समारंभात या जोडप्याने लग्न केले, असा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. टोनी बेग हा १९८४ मध्ये भारतातील काश्मीरमध्ये जन्मलेला एक इंडो-अमेरिकन बिझनेस टायकून आहे. तो डियोज ग्रुपचा संस्थापक आहे. टोनी हा टेलिव्हिजन निर्माता जॉनी बेग यांचा भाऊ आहे. नर्गिसने बॉलिवूडमध्ये रणबीर कपूरसोबत ‘रॉकस्टार’ या सुपरहिट चित्रपटातून पदार्पण केलं होतं. नर्गिसने एका मुलाखतीत सांगितलं की, ती धार्मिक नसली तरीही ती स्वतःला spiritual मानते. तिला सर्व धर्मांविषयी जाणून घ्यायला आवडतं. तिच्या घरात गायत्री मंत्राचं पठण केलं जातं आणि ती स्वतःही हनुमान चालिसा मोठ्या श्रद्धेने म्हणते. ती म्हणते, या मंत्रोच्चारांमधून मिळणारी एनर्जी ती अनुभवते, आणि यामुळे तिचं मन शांत राहतं.

नर्गिस अलीकडेच साजिद नाडियाडवाला यांच्या निर्मित ‘हाऊसफुल ५’ मध्ये दिसली होती. नर्गिसने या चित्रपटासाठी २ ते ४ कोटी घेतल्याचे बोलले जात आहे. तब्बल २२५ कोटी बजेट असणाऱ्या चित्रपटाने ३०० कोटींचा गल्ला जमवला आहे.