‘या’ अभिनेत्रीच्या सासऱ्यांचा होता अंडरवर्ल्डशी संबंध?

Oplus_131072

अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, घरात तलावरीही असायचा, बघा आणखी काय म्हणाली अभिनेत्री

मुंबई – बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन खूप गाजला. ‘बिग बॉस मराठी 5’ मध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री जान्हवी किल्लेकरची सध्या खूप चर्चा सुरु आहे. तिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमुळे तिचा नवरा आणि संपूर्ण किल्लेकर कुटुंब चर्चेत आले आहे. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

नुकत्याच एका मुलाखतीत तिने तिच्या सासरच्या पार्श्वभूमीबद्दल काही रोचक खुलासे केले आहेत. जान्हवीने सांगितलं की, तिच्या सासऱ्यांना ‘भाई’ म्हणून ओळखले जात असे. गळ्यात सोन्याचे दागिने आणि हातातही भारी अंगठ्या असायच्या. त्यांच्या स्वभावात एक वेगळीच रुबाबदारता आणि दबदबा होता. त्याचप्रमाणे, तिचा नवरा देखील त्या काळात तसेच राहत असे. घरचं चांगलंच श्रीमंत आणि प्रभावी असल्यामुळे त्यांच्या राहणीमानात एक वेगळाच डौल दिसायचा. त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय केबल नेटवर्कशी संबंधित होता आणि त्यामुळेही त्यांची एक ठाम ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या घरात तलवारीही असायच्या. तसेच ‘आम्ही असं ऐकलंय’ या शोमध्ये जान्हवीला विचारण्यात आलं की, तू ज्या कुटुंबात लग्न केलं आहेस ते कुटुंब अंडरवर्ल्डवालं आहे का ? यावर जान्हवीने म्हणाली की, “अगदीच नाही म्हणता येणार नाही पण हो… साधारण! कारण माझे सासरे ते जरा गुंडा सारखेच होते. सगळे त्यांना भाईच म्हणायचे. ते गळ्यात अगदी ५० तोळं सोनं, हातात सोनं घालून फिरायचे. माझा नवरापण त्यावेळी तसाच राहायचा. कारण ते घरचे श्रीमंत होते आणि केबलवाले. त्यामुळे घरात तलवारी वगैरे असायच्या. तलवारी घेऊन ते फिरायचे इतके ते जरा गुंड होते. पण मी लग्न होऊन तिथे गेले तेव्हा बाबा शांत होते, सगळं व्यवस्थित होतं. पण त्यांचं बॅकग्राऊंड आहे थोडसं तसं….”ती पुढे म्हणाली, “हो, थोडा बॅकग्राऊंड दमदार आहे, पण आताच्या काळात सगळं बदललं आहे. घरामध्ये शांतता आहे आणि काहीही अयोग्य प्रकार नाहीत.” तिच्या सासरच्यांबद्दलचा हा खुलासा ऐकून सर्वच थक्क झाले आहेत. त्यामुळे तो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. जान्हवी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

https://www.instagram.com/reel/DGDkfmJJwte/?igsh=MXdnbDcyazI4eGd6YQ==

जान्हवी किल्लेकरच्या कामाबद्दल सांगायचं तर तिने कलर्स मराठीच्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली होती. ती सध्या स्टार प्रवाहच्या ‘अबोली’ मालिकेत इन्स्पेक्टरची भूमिका निभावत आहे. तिने त्याआधी ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतही काम केलं आहे.