
बीड – बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन आरोपींवर कारवाई व्हावी, तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. पण अजित पवार याप्रकरणी माैन बाळगून होते. पण आज अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत धनंजय मुंडे यांना अभय दिले आहे.

जोपर्यंत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. न्यायालयीन चौकशी, एसआयटी व सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई केली जाणार नाही. अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत संवाद साधला. त्यानंतर अजितदादांनी हे भाष्य केले आहे. दरम्यान म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्या देण्यासाठी अजित पवार यांच्याकडे आलो होतो. माझ्याकडं जी अन्न व नागरी पुरवाठ्याच्या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे, त्याबाबत संबंध विभागाचा आढावा अजित पवार यांना दिला आहे. अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे. राजीनाम्याच्या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही. हे स्पष्ट आणि इमानदारीने सांगतो आहे. माझ्यावर जे टीका करत आहेत त्यामध्ये महायुतीमधील भाजपमधील आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या अध्यक्षांना प्रश्न विचारावेत.चौकशी होऊ द्या सत्य बाहेर येईल. तपास यंत्रणा काम करेल . माझ्यावर आरोप होत असताना मी यावर बोलणे उचित नाही, असे देखील मुंडे म्हणाले आहेत.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाने राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे. तर भाजपाचे सुरेश धस आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.









