विक्रमी बहुमत मिळूनही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर?

मुंबई – महायुती सरकारला सत्तेत येऊन जवळपास दीड महिना झाला आहे. मात्र अजूनही सरकारमधील रूसवेफुगवे संपलेले नाहीत. सुरूवातीला महत्वाच्या खातेवाटपावरुन तिन्ही पक्षामध्ये रस्सीखेच होती. त्यानंतर पक्षातील नेत्यामध्ये खातेवाटपावरुन नाराजीनाट्य रंगले होते. ते अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. अशातच आता महायुतीलाच तडे जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण जवळपास निम्या मंत्र्यांनी अद्यापही आपल्या खात्याची सूत्री हाती घेतलेली नाहीत.

निवडणुकीत महायुती म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र येऊन विधानसभेत आजवरचे सर्वात मोठे यश मिळवले आहे. पण खातेवाटपात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी दिसून आली. आता पालकमंत्रीपदावरून तिन्ही पक्षांत वाद सुरू आहे. असे असताना सरकारमधील तब्बल १८ मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. यामध्ये तिन्ही पक्षातील मंत्र्यांचा समावेश आहे.
पदभार न स्वीकारलेले मंत्री
आशिष शेलार
अतुल सावे
नरहरी झिरवाळ
भरत गोगावले
गुलाबराव पाटील
दादा भूसे
जयकुमार रावल
माणिकराव कोकाटे
मकरंद पाटील
योगेश कदम
पंकज भोयर
बाबासाहेब पाटील
दत्तात्रय भरणे
प्रकाश आबिटकर
माधुरी मिसाळ
आशिष जयस्वाल
मेघना बोर्डीकर

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बहुतेक मंत्री नवीन वर्षात पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.