आघाडीच्या अभिनेत्रीविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल

अभिनेत्रीला ती पोस्ट करणे पडले महागात, या अभिनेत्रीने ठोकला दावा,नक्की प्रकरण काय?

मुंबई – अभिनेत्री रोजलिन खान ही हिना खान सारखीच कॅन्सरने ग्रस्त आहे. रोजलिनने हिना खानच्या काही स्टेटमेंटवर प्रश्न उपस्थित केले होते. पण अंकिता लोखंडे हिने या वादात उडी घेतली होती. पण यामुळे अंकिता अडचणीत आली आहे.

रोजलिन ही एक फर्स्ट कॅन्सर पेशंट आहे. ती सध्या अनंत अडचणीचा सामना करत आहे. तिने काही लोकांना एक्सपोज करण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोक आपल्याला कॅन्सर असल्याची खोटी माहिती देत आहेत. काही लोक स्टेज २ किंवा स्टेज ३ कॅन्सरला स्टेज ४ सांगत आहे. अशा लोकांना रोजलिन एक्सपोज करणार आहे. अंकिताने रोजलिनच्या विधानाला चीप स्टंट म्हटलं होते. त्यामुळे रोजलिन चांगलीच संतापली असून तिने थेट अंकितालाच अंधेरी कोर्टात खेचले आहे. अंकिताने रोजलिन विरोधात जे म्हटलं होतं, त्याचे स्क्रीन शॉर्ट कोर्टासमोर मांडले आहेत. रोजलिन तिचं काम करत आहे. अंकिताने थर्ड पार्टी बनून तिला त्रास देण्याचं काम केलं आहे. त्यामुळेच आम्ही तिच्यावर केस दाखल केली आहे, असा दावा रोजनिलच्या वकिलांनी केला आहे. अंकिताने तिच्या पोस्टमध्ये लिहीले होते की, “कोणी इतके खालच्या पातळीवर कसे जाऊ शकते? अरे देवा! हे खूप चीप आहे! तुमच्या माहितीसाठी मॅडम, हिना खान कर्करोगाशी खूप धैर्याने लढत आहे. मी हे खूप आत्मविश्वासाने सांगू शकते कारण ते मला माहित आहे. काही दिवसांपूर्वी विकी हिनाला रुग्णालयात भेटला. हिना तिथे रॉकीसोबत होती आणि तिची केमोथेरपी घेत होती. विकीने मला सांगितले की, हिनाची अवस्था पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले. हिना, तू खूप धाडसी आहेस, आमचा शेरखान! देव तुला आशीर्वाद देवो, अशी पोस्ट अंकिताने केली होती.

https://www.instagram.com/reel/DDjUJiZurc1/?igsh=Z2hwZXI4eHJwMWl3

रोझलिनने इंस्टाग्रामवर कागदपत्रे शेअर केली आणि खटला दाखल करण्यामागील कारण स्पष्ट केले. ती म्हणाली, हिना खानच्या शस्त्रक्रियेबद्दल प्रश्न विचारला. हिनाने माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, शिवाय रुग्णालयानेही गप्प राहणे पसंत केले. मात्र काही अज्ञात लोकं मला धमकावत आहेत.