ही गायिका अभिनेत्रीचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल

Oplus_131072

गायिकेचा संताप म्हणाली तुमच्या विरोधात खटला दाखल करू शकते.?, प्रकरण काय?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक सेलिब्रिटींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तयार करुन ते व्हायरल करण्याचे प्रमाण वाढले आहे. आलिया, रश्मिका काजल या डीपफेकच्या बळी ठरल्या आहेत. आता मराठी अभिनेत्री गायिका याची बळी ठरली आहे.

अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकर हिच्यासोबतही असेच काहीसे घडले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आर्या बोलताना दिसत आहे. मात्र, ‘मी असं काही बोलले नाही,’ असं म्हणत आर्याने संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर एका पोस्ट शेअर करत आर्या म्हणाली, ‘काय हा मुर्खपणा आहे. माझ्या कार्यक्रमात मी जे काही बोलली आहे, ते म्यूट करुन तुम्ही माझ्या नावावर वेगळंच काही लिहिलं आहे. जे मी काधी बोललेच नाही. विषय काय आहे, हे देखील मला माहिती नाही. मी बिग बॉस शो पाहत नाही, कधीच पाहिलाही नाही. मला शोमधील एक स्पर्धकही माहिती नाही. तुम्ही हे जे काही केलंय, त्याच्यासाठी मी तुमच्या विरोधात खटला देखील दाखल करू शकते…अशा चॅनेलला ५० हजार सबस्क्राबर्स कसे असतात.’ अशी पोस्ट लिहित रिपोर्ट करण्यासाठी मला मदत करा… असे देखील आर्या म्हणाली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आर्या म्हणत आहे की, पंढरीनाथ दादा सोडलं तर जागेवर स्थिर कोणाचंचं चित्त नाही… असं व्हिडीओवर लिहिलं होतं. यावर आर्याने संताप व्यक्त केला आहे. आर्या हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ फेक असतात, ज्यांचा सेलिब्रिटींशी काहीही संबंध नसतो. पण अशा सोशल मीडिया पोस्टमुळे सेलिब्रिटींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.