
फेब्रुवारीमध्ये ‘या’ तारखेला होणार अधिकृत घोषणा, भाजपाला लवकरच मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष

दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची नियुक्ती करणार आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड १० ते २० फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी महाराष्ट्रातील नेताही चर्चेत आहे.

भाजपाचे विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा यांचा जानेवारी २०२४ मध्ये पक्षाचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला होता. मात्र, पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नड्डा यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवण्यात आला होता. आता नड्डा यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आले आहे. आणि भाजपात एक व्यक्ती एक पद हे धोरण असल्यामुळे नड्डा यांना परत अध्यक्ष करता येणार नाही. त्यामुळे नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि अमित शहा यांच्या मान्यतेने भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. या शर्यतीत आतापर्यंत अनेक नावे समोर आली आहेत. भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, शिवराजसिंह चौहान आणि पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे ही नाव भाजपच्या अध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. तिन्ही नेत्यांनी पक्षांतर्गत कामातून मोठा अनुभव गोळा केला आहे. भूपेंद्र यादव हे मूळचे राजस्थानचे रहिवासी आहेत. तर धर्मेंद्र प्रधान हे ओडिशाचे आहेत. विनोद तावडे मूळचे महाराष्ट्राचे आहेत. हे तिन्ही नेते अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण विनोद तावडे यांनी मागील काळात पक्ष वाढीसाठी केलेले काम पाहता त्यांना अध्यक्षपद मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे गडकरी यांच्यानंतर तावडे हे दुसरे मराठी व्यक्ती सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष होऊ शकतात. पक्षाच्या घटनेनुसार जे सदस्य पक्षाचे किमान १५ वर्षे सदस्य आहेत, तेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तावडे अध्यक्ष झाल्यास आगामी काळात फडणवीस विरूद्ध तावडे असा संघर्ष होणार की, पक्षाला महत्व देत दिलजमाई होणार हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.
भाजपाच्या घटनेनुसार राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी किमान ५० टक्के पक्ष संघटनेच्या निवडणुका पूर्ण होणं आवश्यक आहे. मात्र आतापर्यंत केवळ चार राज्यांमधील प्रदेश अध्यक्षांचीच निवड झाली आहे. त्यामुळे एक महिन्यानंतर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे.









