लाडक्या बहिणींना जुनचा हप्ता मिळण्यास सुरुवात

बहिणींनो हप्ता मिळाला का?, लाडकी बहिण योजनेला वर्ष पूर्ण, पात्र बहिणींना मिळाली एवढी रक्कम?

मुंबई – राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता लवकरच थेट बँक खात्यांमध्ये जमा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी माहिती दिली की, या योजनेसाठी जवळपास ३६०० कोटी रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत. हे पैसे डिजिटल पद्धतीने थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. अजित पवारांच्या या घोषणेमुळे पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात लवकरच हफ्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे महिलावर्गात आनंदाचे वातावरण पसरलं आहे. खरंतर जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल असा दावा करण्यात आला होता. दरम्यान अपात्र महिलांचा गैरवापर रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. काही महिलांनी अयोग्य माहिती देऊन लाभ घेतल्याचे उघड झाल्यानंतर प्राप्तिकर विभाग त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची तपासणी करत आहे. ज्यांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही. योजनेला वर्षपूर्ती झाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी खास पोस्ट केली आहे. ही योजना अशीच अखंडपणे सुरु राहणार आहे, अशी घोषणा आदिती तटकरेंनी केली आहे. महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात जुलै २०२४ पासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण 11 हप्त्यांचे एकूण १६५०० रुपये (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे) लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.

सरकारची महत्त्वाची आणि यशस्वी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात सरकार कडून १५०० रुपये जमा केले जातात. लाडकी बहीण योजनेला १ वर्ष पूर्ण झालं असून महिलावर्ग जून महिण्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.