
मुंबई – लाडकी बहीण योजना निकषांच्या कचाट्यात अडकरणार अशी स्थिती असतानाच राज्यातील लाखो महिलां या योजनेतील सातवा हप्ता केव्हा येणार याकडे डोळे लावून बसल्या आहेत. राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात प्रचंड चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून गेल्या २०२४ या वर्षी असंख्य महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रूपये जमा झाले होते. जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात सातवा हप्ता मिळणार आहे.हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकार संक्रातीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार आहे. सरकार सातव्या हप्त्यासाठी मकरसंक्रातीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. सरकार महिलांना मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. त्यामुळे या मुहूर्तावर जर खरंच सरकारच्या खात्यात पैसे आले तर लाडक्या बहिणींची संक्रात आणखीण गोड होणार आहे. पुढच्या आठवड्यात १४ जानेवारीला मकरसंक्रात आहे. याच मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर सरकार लाडकी बहीणचे पैसे पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे महिलांना आता या हप्त्याची उत्सुकता लागली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातील महिलांनी लाखोंच्या संख्येने अर्ज केले आहेत. त्यातील बहुतांश अर्ज हे सरसकट मंजूर करण्यात आल्याने आणि काही अर्ज केवळ कागदपत्रं किंवा तांत्रिक अडणींमुळे फेटाळण्यात आल्याने लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. अशा वेळी ही योजना कायम सुरु ठेवण्यासाठी राज्य सरकारला निधीसाठी प्रचंड मेहनत करावी लागत आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सूरू केली आहे.त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहेत.

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरूवात जुलै महिन्यापासून केली होती. त्यानंतर योजनेची अर्ज प्रक्रिया राबवून राज्य सरकारने दर महिन्याला महिलांच्या खात्यात १५०० रूपये जमा केले होते. अशाप्रकारे आता डिसेंबर २०२४ पर्यंत सरकारने महिलांच्या खात्यात ९००० रूपये जमा केले आहेत.









