दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर?

पेपर तपासणी आली अंतिम टप्प्यात, या ठिकाणी पाहता येईल निकाल, असे चेक करा मार्क

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल कधी लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. पण आता त्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. तर, दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल बारावीच्या निकालानंतर सुमारे दहा दिवसांच्या अंतराने जाहीर केला जाऊ शकतो. परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणीला वेगाने सुरुवात करण्यात आली होती आणि आता निकाल ऑनलाइन जाहीर करण्याच्या प्रक्रियेला अंतिम रूप दिले जात आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल नेमका कधी जाहीर होणार? याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, २५ ते २७ मे २०२५ या दरम्यान हा निकाल घोषित होऊ शकतो. दुसरीकडे, १२ वीचा निकाल हा मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात, म्हणजे १० ते २० मे २०२५ च्या आसपास येण्याची अपेक्षा आहे. हे दोन्ही निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर, म्हणजेच mahresult.nic.in वर उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून निकाल पाहता येईल.

२०२५ या शैक्षणिक वर्षासाठी, १० वीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत पार पडल्या, तर १२ वीच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत झाल्या. या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होतील, याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे. मागील वर्षी, २०२४ मध्ये १० वीचा निकाल २७ मे रोजी आणि १२ वीचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला होता.