लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे | लोणी काळभोर येथे विजेच्या धक्क्याने गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.लोणी काळभोर येथील बाजारमळा परीसरातील मोगले वस्तीत ही घटना घडली आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.सोमनाथ रामचंद्र काळभोर यांची ही गाय होती मिळालेल्या माहितीनुसार काळभोर कुटुंबीय झोपलेले असताना पहाटे पाचच्या सुमारास गाईचे ओरडण्याचा आवाज आल्याने काळभोर कुटुंबीय जागे झाले असता दरवाजात असतारी गाई निपचित पडल्याचे दिसून आले.
दरवाजात असणाऱ्या शेळ्या तडफडत असल्याचे दिसल्याने शेळ्यांच्या दोऱ्या सोडण्याचा प्रयत्न केला असता सौम्य स्वरुपाचा धक्का बसल्याचे जाणवले त्यांनी तेथुन शेळ्या दुसरीकडे हलवल्याने शेळ्या वाचल्या.पावसाने जमीन ओली असल्याने घराशेजारील पत्राशेडला फुल सप्लाय होता आणि त्याच शेडमध्ये काळभोर कुटुंबीय आणि मुलगा झोपलेला होता लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. फोनवरुन वायरमन अजय डोंगरे त्यांच्याशी संपर्क साधला असता रात्रभर जागरण करुन काम केलेले डोंगरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन क्षणाचाही विलंब करता लाईट बंद केल्याने पुढील दुर्घटना टळली.
सर्विस वायर टाकण्यासाठी असलेल्या जी आय तारेतून विद्यूत प्रवाह प्रवाहीत झाल्याने ही घटना घडल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.लोणी काळभोर महावितरणचे शाखा अभियंता रामप्रसाद नरवडे व लोणी काळभोरचे पशुवैद्यकीय आधिकारी डॉ निता बबुले या दोनही आधिकाऱ्यांनी रविवार सुट्टीचा दिवस असतानाही घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली.