हवेली तालुका प्रतिनिधी – सचिन सुंबे | पूर्व हवेलीतील अनेक चार चाकी गाड्यांच्या काचावर फिल्मिंग लावलेल्या आहेत. वाहतूक पोलीस याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करत असून कारवाई कधी ? असे वृत्त राँयल मिडिया न्यूज वर झळकले होते.रॉयल मिडिया न्यूज च्या दणक्याने काही तासात लोणी काळभोर वाहतूक शाखेने काळया काचेच्या गाड्यांवर धडक कारवाई चालू केली असून रॉयल मिडियाच्या या दणकेबाज बातमीची सर्वत्र चर्चा होत आहे
काचावर लावलेल्या काळया फिल्मिंग वर कारवाई कधी ? वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, वाहतूक पोलीस कशात दंग ? अशी बातमी रॉयल मिडिया न्यूज ने लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.चारचाकी गाडीच्या काचांवर काळी फिल्मिंग लावली की आपली गाडी उठून दिसते असे मत अनेक गाडी घेतलेल्या नागरिकांचे झाले होते . पण या काळया काचेच्या नावाखाली अनेक गैर धंदे चालू असुन दारु वाहतूक ,गुटखा वाहतूक व इतर धंदे सरास चालू आहेत. त्याकडे वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष झाले होते . वाहतूक पोलीस मात्र या मोठमोठ्या किमंतीच्या गाडया बघून सविस्तर दुर्लक्ष करत असुन पोलिसांचा वचक कमी पडत आहे की काय असे नागरिकांना वाटत होते.भाजीपाल्याच्या टेंम्पोमध्ये भाजी घेऊन चाललेल्या शेतकऱ्यांशी हुज्जत घालताना पोलीस दिसत होते. त्याच वेळेस चारचाकी काळया काचा असलेल्या वाहनातील चालक पोलिसांना ओळख देऊन जात होते. मात्र पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचे दिसून येत होते. वाहतुकीचे नियम सगळ्यांना सारखेच असताना पोलीसांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले होते .मोठ्यांना सुट व गरीबांची लुट अशी अवस्था झाली होती.
काही तासांमध्ये लोणी काळभोर वाहतूक शाखेने चारचाकी वाहनावर कारवाई सुरु केल्याने काचांवर काळी फिल्मिंग करणाऱ्या चालकांचे धाबे दणाणले आहेत.कारवाई करते वेळी १०० टक्के काळी फिल्मिंग लावलेल्या गाड्या दिसून आल्या तसेच नंबर प्लेट नसलेल्या गाड्या सुद्धा दिसून आल्या. केलेल्या दोन तासाच्या कारवाईत दहा हजाराच्या पुढे दंड वसूल झाला असून यापुढे काळा काचांच्या फिल्मिंग केलेल्या गाड्यांवर कारवाई चालू राहणार असून वाहन चालकांनी स्वतःहून फिल्मिंग काढून घ्यावी व फिल्मिंग केलेल्या काळा काचांच्या गाड्या चालवू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आव्हान पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी रॉयल मिडिया न्यूजशी बोलताना केले.
ही कारवाई लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आनंद साळुंखे , पोलीस हवलदार विवेक जगताप ,पोलीस हवालदार विजय दाभाडे ,पोलीस हवालदार संदीपकुमार गोवेकर ,पोलीस हवालदार विजय कांबळे , पोलीस हवालदार संजय आंग्रे ,पोलीस शिपाई विजय काणेकर , पोलीस हवालदार चेतन सुलाखे , पोलीस हवालदार रामदास गिरमे यांनी कारवाई केली. यावेळी ट्राफिक वार्डन दादा लोंढे ,सागर राऊत हे मदतीला होते .