
बोल्ड कंटेनमुळे अभिनेत्रीची ओळख, तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल, अभिनेत्री सोशल मीडियावर जोरदार ट्रोल

दिल्ली – ‘कच्चा बदाम’ या गाण्यावरील डान्स व्हिडीओमुळे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेली अंजली अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका धार्मिक ऐतिहासिक पात्रातील तिचा फोटो चांगलाच वादात सापडला आहे.

सोशल मीडियावर अंजली अरोराचा फोटो व्हायरल झाल्यानंतर एकच चर्चा सुरू आहे. ती ‘श्री रामायण कथा’ या आगामी चित्रपटात सीता मातेची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, तिच्या या भूमिकेच्या पहिल्या लूकवर नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली असून, अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. अंजलीचा सीतेच्या अवतारातील लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. मात्र, अनेक नेटिझन्स अंजलीनं सीतेची भूमिका साकारल्यानं नाराज आहेत. अनेक इंटरनेट युजर्सनी अंजलीच्या या नवीन लूकवर नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर या फोटोमध्ये अंजलीने केशरी रंगाची साडी नेसली आहे. साडी नेसण्याची पद्धत ग्रामीण धाटणीची असून, पदर डोक्यावर घेतला आहे. हातात सोन्याच्या बांगड्या घातल्या आहेत. तिचा मेकअप अगदी साधा आहे. कपाळावर एक छोटी लाल टिकली आणि केस मोकळे सोडले आहेत. तिच्या हातात फळांची टोपली आहे, ज्यात केळी, सफरचंद आणि संत्री दिसत आहेत. सोशल मीडियावर अंजलीची प्रतिमा एक बोल्ड इन्फ्लुएन्सर म्हणून आहे. तिचे विविध डान्स व्हिडीओ नेटकऱ्यांनी पाहिले आहेत, ज्यामध्ये ती तोकडे कपडे घालून नाचताना दिसते. त्यामुळे अशा व्यक्तीला सीतेची भूमिका दिल्याने नेटकरी नाराज झाले आहेत. ‘हिला सीता बनवणं हा खूप मोठा अपमान आहे’, असं नेटकऱ्यांनी म्हटले आहे. एका नेटिझननं लिहिलं आहे, ‘सीता मातेचा का अपमान करताय’ दुसऱ्या एका नेटकऱ्यानं म्हटलं की, ‘भारतात किती सुंदर मुली आहे, हिच सापडली का तुम्हाला’, एकानं लिहिलं की, ‘ही शूर्पणखेच्या भूमिकेसाठी योग्य आहे’, त्यामुळे चित्रपट निर्मितीआधीच वादात सापडली आहे.
https://www.instagram.com/p/DPveWbTEk8T/?igsh=ZGc1bGhsc3ozdjJj
यावर अद्याप अंजलीने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. ‘रामायण’ या पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक सिंग करत आहे. तर प्रकाश महोबिया आणि संजय बुंदेला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. यामध्ये ती रजनीश दुग्गल, शील वर्मा, निर्भय वाधवा आणि देव शर्मा यांच्यासोबतत काम करणार आहे.









