हडपसर प्रतिनिधी – महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ मुंढवा मांजरी रोड झेड कॉर्नर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हडपसर विधानसभा मतदारसंघाची विजय निर्धार सभा संपन्न झाली.
यावेळी जयंत पाटील यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. लोकसभेत फटका बसल्यानेच शिंदे-फडणवीस-पवार त्रिकुटाने राज्याच्या तिजोरीचे दारे बाजूला ठेवून घोषणांचा पाऊस सुरु केला.सगळेच लाडके असल्याचे सांगत प्रसिद्धीसाठी वारेमाप पैशांची उधळपट्टी केली. राज्यावर लाखो कोटींचे कर्ज केले आहे. मात्र, हे लोक २० नोव्हेंबरपर्यंतच लाडक्या बहिणी म्हणणार आहेत. त्यानंतर त्या लाडक्या राहणार नाहीत. सल्लागारांच्या भरोशावर हे राज्यकर्ते काम करत आहेत असेही जयंत पाटील म्हणालेचेतन तुपे यांनी हडपसर मतदार संघात ३०० कोटी आणले काम तर काहीच दिसत नाही. मग हे पैसे गेले कुठे? हडपसरचा काहीच विकास काहीच झाला नाही, वाहतूक कोंडी मुक्त हडपसर करणार होते त्याचे काय झाल असा सवाल भर सभेत जयंत पाटील यांनी केला आहे
“आमचे घड्याळ चोरून नेणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने चिन्हाखाली ‘न्यायप्रविष्ट’ लिहिण्याची सक्ती केली. हे जगातील पहिलेच उदाहरण असावे. ज्यांनी राष्ट्रवादी पक्ष जन्माला घातला, त्यांना त्यापासून तोडण्याचे पाप भाजपने केले. त्यामध्ये ज्यांना आम्ही मोठे केले, तेच लोक होते. मात्र, आजही ८४ वर्षांचा हा योद्धा दिवसाला चार-पाच सभा घेतो. अकार्यक्षम, गद्दार आमदाराला घरी बसवायचे आहे.पवार साहेबांच्या नावावर निवडून येऊनही चेतन तुपे यांनी पक्षाशी गद्दारी केली. या संघर्षाच्या काळात आम्ही पवार साहेबांची साथ सोडलेली नाही. याच निष्ठेचे आणि माझ्या कामाचे फळ मला मिळालेली उमेदवारी आहे. पवार साहेबांविषयी वाईटसाईट बोलणाऱ्या तुपे यांना धडा शिकवायचा आहे.असे जयंत पाटील म्हणाले