पोलीस ठाण्यातीलच सीसीटीव्ही तपासा….तर त्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करा…बघा सविस्तर बातमी

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात रविवारी (19 मे) भरधाव वेगात आलेल्या पोर्श कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार अनेक मीटरपर्यंत फरफटत गेला.या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला. अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा अशी मृतांची नावे आहेत. दोन्ही आयटी अभियंते मध्य प्रदेशातील असून ते सध्या पुण्यात राहत होते. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असून त्याला न्यायालयाने काही तासांत जामीन मंजूर केला. कोर्टाने जामिनासाठी अशा अटी ठेवल्या आहेत की वाचून तुम्हाला धक्का बसेल. या प्रकारामुळे पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. या प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.

पुण्यातील बिल्डरच्या मुलाने बेदरकारपणे गाडी चालवून 2 जणांचे जीव घेतल्याच्या घटनेत कठोर कारवाईचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करुन आदेश दिले आहेत. या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या देखील सूचना दिल्यात. या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष ट्रिटमेंट दिली असल्यास, त्यावेळचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशाही सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

पुण्यातील ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी असलेल्या बिल्डरपूत्राला काही तासातच जामीन मिळाल्याने पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. आज याच मुद्यावर सर्वपक्षीय नेतेमंडळी पोलीस आयुक्तांना भेटली आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी या सर्व पक्षीय शिष्टमंडळांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली. तर काँग्रेसतर्फे येरवडा पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं जाणार आहे. दरम्यान, याप्रकरणातील अल्पवयीन आरोपीनं केलेला गुन्हा मोठा असल्याने त्याला सज्ञान समजून त्यावर केस चालवावी, अशी विनंती आपण वरच्या कोर्टात केली असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणालेत. तसंच या मुलाच्या बापाविरूद्ध देखील जेवुनाईल कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल केल्याचं आयुक्तांनी सांगितलं. या केसमधे पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नसून आम्ही आरोपींना कठोरात कठोर कलमं लावली असल्याचंही अमितेश कुमार म्हणाले.