केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्राचा सन्मान

महाराष्ट्रात कोणकोणाचा पद्म पुरस्काराने सन्मान? अशोक सराफ ते मनोहर जोशी वाचा संपुर्ण यादी

मुंबई – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजे काल केंद्र सरकारने पद्म, पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १३९ जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण’ तर अशोक सराफ यांनी ‘पद्मश्री’ याचबरोबर अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली, होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे, यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.एकूण १९ जणांना पद्मभूषण जाहीर झाला आहे. यापैकी महाराष्‍ट्रातील तिघांचा समावेश आहे. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्‍कार असलेले पद्म पुरस्‍कार तीन विभागात दिला जातो पद्मविभूषण, पद्मभूषण , पद्मश्री अशा विभागात पुरस्‍कार दिले जातात. कला, क्रिडा, समाजसेवा, अभियांत्रिकी, शिक्षण, उद्योग, नागरी सेवा, व्यापार, विज्ञान अशा क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्‍तिमत्‍वांना हे पुरस्‍कार दिले जातात.

महाराष्ट्रातील पद्म

अच्युत पालव – कलाक्षेत्र
अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग
अशोक सराफ – कलाक्षेत्र
अश्विनी भिडे-देशपांडे – कलाक्षेत्र
चैत्राम पवार – सामाजिक सेवा
जसपिंदर नरुला – कलाक्षेत्र
मारुती चितमपल्ली – साहित्यिक आणि अभ्यासक
रणेंद्र मुजुमदार – कलाक्षेत्र
सुभाष शर्मा – शेती
वासुदेव कामत – कलाक्षेत्र
विलास डांगरे – औषध

या वर्षी एकूण १३९ पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये ०७ पद्म विभूषण, १९ पद्म भूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यांसह २३ महिला तर १० हे परदेशी नागरिक आहेत. यातील १३ मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.