
अनेक संघाकडून अनपेक्षित नावाची घोषणा, पाच संघानी कर्णधार बदलले, हा संघ ठरणार या कारणाने वेगळा

मुंबई – लवकरच आयपीएलचा १८ वा सिजन सुरु होणार आहे. आत्तापर्यंत एकत्र खेळणारे अनेक खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. त्यातच आता २२ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलसाठी सगळ्या टीमने आपल्या कर्णधार पदाची घोषणा केली आहे.

आयपीएल २०२५ मध्ये १० पैकी ५ संघ नवीन कर्णधारांसह खेळताना दिसतील. उर्वरित ५ संघांनी त्यांचे जुने कर्णधार कायम ठेवले आहेत. सर्व १० संघांपैकी ९ कर्णधार भारतीय आहेत तर फक्त एक कर्णधार परदेशी आहे. आयपीएल २०२३ पासून संजू सॅमसन हा एकमेव कर्णधार आहे ज्याला त्याच्या संघाने कर्णधार म्हणून कायम ठेवले आहे. तेव्हापासून उर्वरित सर्व ९ संघांनी त्यांचे कर्णधार बदलले आहेत. स्पर्धेतील १० पैकी ९ संघांनी त्यांच्या कर्णधारांची घोषणा खूप आधी केली होती पण दिल्ली संघाने सस्पेन्स कायम ठेवला होता. पण आता त्यांनीही कर्णधाराची घोषणा केली आहे.
आयपीएल 2025 मधील सर्व संघांच्या कर्णधारांची नावे
मुंबई इंडियन्स (MI) – हार्दिक पांड्या
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) – ऋतुराज गायकवाड
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) – अजिंक्य रहाणे
सनरायझर्स हैदराबाद (SRH) – पॅट कमिन्स
गुजरात टायटन्स (GT) – शुभमन गिल
राजस्थान रॉयल्स (RR) – संजू सॅमसन
लखनौ सुपर जायंट्स (LSG) – ऋषभ पंत
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) – रजत पाटीदार
पंजाब किंग्ज (PBKS) – श्रेयस अय्यर
दिल्ली कॅपिटल्स (DC) – अक्षर पटेल









