ब्रेकिंग! भाजपाकडून या युवा आमदारावर अध्यक्षपदाची धुरा

भाजपाने अध्यक्षपदासाठी भाकरी फिरवली, मुख्यमंत्री फडणवीसांकडून घोषणा, कारण काय?

मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. आमदार अमित साटम यांची भाचपच्या मुंबई अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.

अमित साटम यांना मुंबई भाजपच अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. प्रवीण दरेकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती. पण अमित साटम यांना मुंबई अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. अमित साटम मुंबई उपनगरातून येतात. अमित साटम हा भाजपचा आक्रमक आणि अभ्यासू चेहरा म्हणून ओळख आहे. अमित साटम यांनी गेली अनेक वर्षे मुंबईच्या पश्चिम उपनगरात नगरसेवक आणि आमदार म्हणून काम केले आहे. अमित साटम हे तीनवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांना मुंबईतील नागरी प्रश्नांची चांगली जाण आहे. अमित साटम यांनी विधानसभा आणि विविध व्यासपीठांवर भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्याचे काम केले आहे. या सगळ्यामुळे भाजप नेतृत्त्वाने त्यांच्या खांद्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याचे सांगितले जात आहे. पुन्हा महायुतीची मुंबईत सत्ता येईल हा विश्वास आहे. सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्या ते चांगल्या पद्धतीनं पार पडतील. सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीमागं आहेत. अमित साटम यांना शुभेच्छा देतो, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे. आशिष शेलार यांची मंत्रीपदावर वर्णी लागल्यामुळे साटम यांना अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

अमित साटम हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. ऑक्टोबर २०१४ पासून ते सलग तिसऱ्या कार्यकाळात अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधानसभेचे आमदार म्हणून काम करत आहेत. तसेच नगरसेवक म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.