ब्रेकिंग! दिल्ली विधानसभा निवडणूक हा पक्ष जिंकणार

दिल्ली – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जोरदार कामगिरी करणाऱ्या भारतीय जनता पक्षासाठी चांगली बातमी आली आहे. दिल्ली विधानसभेसाठी अनेक वर्षांपासून सुरु असलेला भाजपचा राजकीय वनवास संपण्याची चिन्हे दिसत आहे. पण यासाठी त्यांना आपचे कडवे आव्हान असणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. यानंतर आता देशाच्या राजधानीत राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. पण दिल्ली विधानसभा निवडणुकीवरील पहिल्या सर्वेक्षणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. टाईम्स नाऊ जेव्हीसी पोलमध्ये आप आणि भाजपमध्ये अगदी अटीतटीची लढत होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या निवडणुकीत आपला ५५ टक्के महिला मते मिळू शकतात. भाजपला ३९%, काँग्रेसला ५% आणि इतरांना १% महिला मते मिळू शकतात. तर सर्व मतदारांचा विचार केल्यास आपला ५१.३० लाख (५१.२०%) मते मिळू शकतात. तर, दुसरीकडे भाजपला ४०.६३ टक्के मतांसह ४०.७० लाख मते मिळू शकतात. तसेच, काँग्रेसला ६.२ टक्के आणि इतरांना १.५४ टक्के मते मिळू शकतात. जागांसंदर्भात बोलायचे झाल्यास, आम आदमी पक्षाला ५६-६० जागा मिळू शकतात आणि भाजपला १०-१४ जागा मिळू शकतात. अशा परिस्थितीत काँग्रेसचे तर खातेही उघडणार नाही. पण भाजपाने एखाद्या लोकप्रिय योजनेची घोषणा केल्यास आम आदमी पक्ष बहुमतापासून दूर राहू शकतो. त्यांना २७ ते ३३ जागा मिळू शकतात. तर, भाजप ३७-४१ जागांपर्यंत मजल मारू शकतो. तर काँग्रेसला ०-२ जागां मिळू शकतात. दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीचा मुख्य सामना देशातील तीन राष्ट्रीय पक्षांमध्ये होणार असला, तरी आम आदमी पक्षाने सध्या प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे.

२०२० मधील निवडणुकीत आम आदमी पक्षाला ५३.५७ टक्के मतांसह ६२ जागा मिळाल्या, तर भाजपला ८ जागांसह एकूण ३८.५१ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला ४.२६ टक्के मते मिळाली होती, परंतु एकही आमदार निवडून आला नव्हता.