ब्रेकिंग! आता १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

अर्थमंत्री सीतारामन यांची मोठी घोषणा, नोकरदारांना दिलासा, असा असणार नवा टॅक्स स्लॅब?

दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याबाबत अपेक्षा होती, तर ओल्ड टॅक्स रिजीममधून कर भरणाऱ्यांसाठी काय नियम आणले जाणार याची उत्सुकता देखील होती.

केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्लमा सीतारमण यांनी जाहीर केलं आहे. पण १२ लाखांपर्यंतची सूट फक्त नोकरदार वर्गाला आहे. पण जर याव्यतिरिक्त गुंतवणुकीतून कमाई होत असेल तर त्यांना ही सूट मिळणार नाही. ८ लाख उत्पन्न असल्यास ७० हजार आणि २५ लाख असल्यास १ लाख १० हजारांची कर सवलत मिळेल. यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणेत सांगितले की, पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणले जाईल. या प्रत्यक्ष कर सुधारणांबद्दल आम्ही तुम्हाला नंतर सांगू, असंही सीतारमण यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे मंदावलेली वाढ आणि महागाई या आव्हानांना तोंड देणाऱ्या मध्यमवर्गाला दिलासा मिळाला आहे. सध्या वार्षिक ७ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या पगारदारांना कोणतेही दायित्वही नाही, ज्यावर ७५ हजार रुपयांची मानक वजावट म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन लागू आहे.

नवा टॅक्स स्लॅब

– ०-४ लाख रुपयांपर्यंत कोणताही कर नाही

– ४-८ लाख रुपयांपर्यंत ५ टक्के कर

– ८-१२ लाख रुपयांपर्यंत १० टक्के कर

– १२ – १६ लाख रुपयांपर्यंत १५ टक्के कर

– १६-२० लाख रुपयांपर्यंत २० टक्के कर