यवतमाळमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा नाल्यात आढळला मृतदेह; घातपाताचा संशय

दलापुरात दोन चिमुरडींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे वातावरण तापलेलं असताना आता यवतमाळमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे.

ही मुलगी गेल्या २ दिवसांपासून बेपत्ता होती. मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात याबाबत माहिती दिली होती. मुलीचा शोध सुरु होता.  या दरम्यान तिचा मृतदेह आज नाल्यात आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसापासून अल्पवीयन मुलगी ही बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनी तिचा प्रचंड शोध घेतला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पण मुलीचा शोध लागत नव्हता. त्यामुळे मुलीचे कुटुबिय प्रचंड चिंतेत होते.

अखेर ज्याची भीती होती तेच घडलं. मुलीचा मृतदेह आज गावालगतच्या नाल्यात आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलीचा मृतदेह आज सकाळी नाल्यात आढळला आहे. गावालगत असलेल्या नाल्यावर सकाळी मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला तिचा मृतदेह नाल्याच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. त्याने लगेचच या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची पाहणी केली. तिने आत्महत्या केली की तिचा घातपात झालाय? याचा शोध पोलीस घेत आहेत.