
निवडणुकीच्या दृष्टीकोणातून ९० जणांची जम्बो टिम, वाचा कोणत्या जिल्ह्यात कोण अध्यक्ष

मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून महाराष्ट्रातील २२ जिल्ह्याध्यक्षांची निवड करण्यात आली. याआधीही निवडी करण्यात आल्या होत्या. पण काही जागांबाबत निर्णय राखून ठेवण्यात आला होता. आता त्य जागांच्या निवडी घोषित करण्यात आल्या आहेत.

मराठवाड्यातील व राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अंतर्गत गटबाजी आणि सहमती होत नसल्याने शहर व जिल्हाध्यक्षांच्या निवडीला ब्रेक लागला होता. त्यात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी आणि लातूर जिल्ह्याचा समावेश होता. भारतीय जनता पक्षाने राज्यातील उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांची नावे अखेर जाहीर केली आहेत. याआधी पक्षाकडून ५८ जिल्हाध्यक्षांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता उर्वरित जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठकपार पडली. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक सिंह, सह-संघटनमंत्री शिवप्रकाश आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित राहून जिल्हाध्यक्ष निवडीसंबंधी चर्चा केली होती. अखेर उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी जिल्हाध्यक्ष असणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने, काही जिल्ह्यांमध्ये चर्चा पूर्ण झाल्यानंतर आणि स्थानिक व केंद्रीय नेत्यांमध्ये समन्वय साधल्यानंतर उर्वरित जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
१. पालघर – भरत राजपूत
२. वसई विरार – प्रज्ञा पाटील
३. अहिल्यानगर शहर – अनिल मोहिते
४. नाशिक शहर – सुनील केदार
५. नाशिक दक्षिण – सुनील बच्छाव
६. नाशिक उत्तर – यतीन कदम
७. पुणे दक्षिण (बारामती) – शेखर वढणे
८. कोल्हापूर शहर – विजय जाधव
९. गडचिरोली – रमेश बारसागडे
१०. चंद्रपुर शहर – सुभाष कासमगुट्टवार
११. चंद्रपूर ग्रामीण – हरिष शर्मा
१२. वर्धा – संजय गाते
१३. परभणी ग्रामीण – सुरेश भुबंरे
१४. छत्रपती सांभाजीनगर शहर – किशोर शितोळे
१५. लातूर शहर – अजित पाटील कव्हेकर
१६. लातूर ग्रामीण – बसवराज पाटील
१७. नांदेड उत्तर – अॅड. किशोर देशमुख
१८. नांदेड दक्षिण – संतुकराव हंबर्डे
१९. बीड – शंकर देशमुख
२०. उत्तर पश्चिम मुंबई – ज्ञानमूर्ती शर्मा
२१. दक्षिण मध्य मुंबई – निरज उभारे
२२. दक्षिण मुंबई – श्रीमती. शलाका साळवी









