
या कारणामुळे सोन्याच्या दरात होत आहेत उलटफेर, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने आणि चांदीचे दर जाणून घ्या?

मुंबई – सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा उलटफेर पाहायला मिळाले आहेत.

आज सोने दरात ६०० रुपयाची वाढ झाली असून यामुळे सोन्याचा दर नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे सलग चार दिवसापासून चांदीचा दर मात्र स्थिर आहे. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २९ ऑगस्ट २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १०२,३९० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ९३,८५८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ११७,५५० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,१७६ रुपये आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर १०२,२१० रुपये आहे. तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९३,६९३ रुपये आहे. जीएसटीसह याच सोन्यासाठी ग्राहकांना १ लाख ५ हजार ६० रुपये मोजावे लागत आहेत. त्याचप्रमाणे, 22 कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीशिवाय ९३ हजार ४३० रुपये असून, जीएसटीसह तो ९६ हजार २३२ रुपयांवर पोहोचला आहे. सध्या एक किलो चांदीचा दर जीएसटीसह ती १ लाख २१ हजार ५४० रुपयांवर पोहोचली आहे. सध्या सण-उत्सवाच्या काळात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा महिलांचा उत्साह नेहमीच असतो. मात्र, सध्याच्या अनपेक्षित भाववाढीमुळे ग्राहकांना हात आखडता घ्यावा लागत आहे. दरम्यान, सोने आणि चांदीचे भाव अनेक जागतिक आणि स्थानिक घटकांच्या आधारे दररोज ठरवले जातात. सोने आणि चांदीच्या किमतीत महिनाभर बदल दिसून आला आहे.
जागतिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती देखील सोने आणि चांदीच्या भावावर परिणाम करत असतात. सोन्याच्या किंमती जागतिक बाजारातील चढ-उतारांनुसार आणि स्थानिक मागणीनुसार दररोज अनेक वेळा बदलू शकतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जास्तीचे टॅरिफ लावल्यामुळे सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत.









