अजित पवारांना मोठा धक्का, ‘हा’ नेता सोडणार साथ

सांगली – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासूनच सांगली मतदारसंघ राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिला आहे. या ठिकाणी निवडणुकीच्या काही दिवस आधी मोठा राजकीय ट्विस्ट आला होता. पण आता या सांगलीत मोठा ट्विट आला आहे. त्यामुळे महायुतीत पुन्हा मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काका पाटील चक्क अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. तसेच त्यांनी तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्याविरोधात निवडणुक लढवली होती. पण त्यांना पराभव पहावा लागला. आता संजय पाटील पुन्हा भाजपात वापसी करतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. संजय पाटील यांनी भाजप सदस्य नोंदणी अभियानासाठी पूर्ण ताकदीनं करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे ते लवकरच अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, संजय पाटील यांनी याबाबत अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सलग दोनवेळा विजयी झालेल्या संजयकाकांना तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत संजय पाटील कोणती भूमिका घेणार? याची चर्चा होत होती. अधिकृतपणे संजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. मात्र त्यांनी भाजपच्या सदस्य नोंदणीसाठी आवाहन केले. त्यामुळे संजयकाका पुन्हा एकदा राजकीय भूमिका बदलणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. दरम्यान
लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला होता. या निवडणुकीत ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना तिकीट दिलं होते. तर महायुतीने संजय पाटील यांना उमेदवारी दिली होती. पण, बंडखोरी करत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी केली आणि विजय मिळवला होता. पण भाजपा प्रवेशाबाबत संजय पाटील यांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून दबदबा असलेला भाजप याठिकाणी अस्तित्वाच्या शोधात असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र पराभूत संजय पाटील पुन्हा भाजपात आल्यास तिथे भाजपाची ताकत वाढणार आहे.