मोठी बातमी! …’हे’ रिक्षा परवाना होणार रद्द?

पुणे – रिक्षा चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे आरटीओने रिक्षा चालक आणि परमिटबाबत मोठा निर्णय घेताला आहे. या नवीन नियमाचा सरकारी किंवा खासगी कार्यालयात नोकरी करून रिक्षा चालवणांना दणका बसणार आहे. या नवीन नियमाबाबत समिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

आरटीओच्या नव्या निर्णयानुसार आता पुण्यात खुल्या रिक्षा परवाना धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आरटीओच्या या नवीन नियमाचा फटका सरकारी नोकर व खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या रिक्षा चालकांना बसणार आहे. नवीन नियमानुसार, सरकारी किंवा खासगी कार्यालयात नोकरी करणाऱ्या चालकांचे रिक्षा परवाने रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा नोकरदारांनी येत्या ३१ जानेवारीपर्यंत स्वत:हून आरटीओ कार्यालयात रिक्षा परवाने जमा करावे असे आवाहन करण्यात आले आहे. दिलेल्या मुदतीत परवाने जमा न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे आरटीओने दिला आहे. दरम्यान कायद्यानुसार रिक्षा परवाना देताना संबंधित व्यक्ती सरकारी, किंवा इतर कोणत्याही खासगी संस्थेत नोकरी करत नसल्याची अट आहे. संबंधित व्यक्तीकडून याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात येत असते.

पुणे आरटीओतर्फे आत्तापर्यंत १ लाख १९ हजार ९७२ रिक्षा परवाने वितरित करण्यात आले आहे. मात्र, यातील काही परवानाधारक रिक्षाचालक हे नोकरी करतात आणि यातील काही जण भाड्याने आपला परवना देतात. त्यामुळे पुर्णपणे रिक्षा व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे आरटीओने हा निर्णय घेतला आहे.