पुणे येथील अपघात प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही, असा ठपका या दोन्ही अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला, त्यामुळे दोघांनाही निलंबित करण्यात आलं आहे.
अपघात घडल्याची माहिती मिळाल्यानंतर येरवडा पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी हे घटनास्थळी जाऊन भेट देऊन आले होते. या दोन्ही अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर भेट दिल्यानंतर अपघाताची इत्यंभूत माहिती पोलीस कंट्रोलला कळवण अपेक्षित होतं, हीच कामकाजाची पध्दत असते, पण त्यांनी तसं न केल्याचं प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीत आढळून आलं आहे, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
दरम्यान अल्पवयीन मुलाचे आरोपी विशाल अग्रवाल यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी विशाल अग्रवाल यांचा आणखी तपास करायचा असल्यामुळे पोलीस कोठडीची मागणी केली होती, पण 420 सारख्या गुन्ह्याच्या आरोपात पोलीस कोठडीची गरज नाही, असं म्हणत न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली.