मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांविरोधात एफआयआर दाखल

ही चूक पडली महागात? पोलिसांची कारवाई, हा नियम तोडल्याने एफआयआर दाखल

दिल्ली – राजधानी दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. इथे आप आणि काँग्रेस स्वतंत्र लढत असल्याने या ठिकाणी आता तिरंगी लढत होणार आहे. पण आपला जोरदार धक्का बसला आहे. कारण
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर नवी दिल्लीतील नॉर्थ अॅव्हेन्यू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम आदमी पार्टी बनावट फोटो वापरून प्रचार करत असल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. दुसरीकडे गोविंदपुरीमध्ये मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर सरकारी वाहनाचा निवडणुकीत प्रचारात वापर केला म्हणून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कारवाईनंतर आपचे संयोजक अरविंद केजरीवालयांनी एक्सवर (ट्विटर) प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ह्यांचे नेते सर्रास पैसे वाटतात. साडी, सोन्याची चेनही वाटप करतात. बनावट मतं तयार करतात. असं असताना एकही गुन्हा दाखल होत नाही. पण मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरुद्ध मात्र तत्काळ गुन्हा दाखल होतो. आम आदमी पार्टी या सगळ्या यंत्रणेविरुद्ध लढा देत आहे. या यंत्रणेला आता जनतेला सोबत घेत बदलायचं आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्हीही पक्ष या सिस्टीमचा भाग आहेत, असा आरोप केला आहे. दरम्यान कालकाजी विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार आणि मुख्यमंत्री आतिशी यांनी सोमवारी उमेदवारी रॅली काढली, परंतु त्या उमेदवारी अर्ज दाखल न करताच परतल्या. नावनोंदणीसाठी उशिरा पोहोचल्‍याने त्‍यांना माघारी परतावे लागले होते. आज त्यांनी आपला अर्ज दाखल केला.

दिल्‍ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेली पोहचली आहे. आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत असून, आरोप-प्रत्‍यारोपाच्‍या फैरी झडत आहेत. येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून येत्या 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे.