
भोसरी – भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिस कंट्रोल रूमला फोन करत मला महेश लांडगे यांची सुपारी मिळाल्याचे सांगत लांडगे यांना दिली जीवे मारण्याची धमकी दिली. मोशी मधील तरुणाला या संदर्भात ताब्यात घेण्यात आले आहे.

उदय कुमार राय असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला उदय कुमारने फोन करून महेश लांडगे यांची सुपारी मला मिळालेली आहे. अशी माहिती फोनद्वारे दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि अवघ्या काही तासांत उदयकुमार रायला ताब्यात घेतले आहे.

उदयकुमार राय हा छत्तीसगडचा असून गेल्या पाच वर्षांपासून तो भोसरी मध्ये राहत आहे. त्याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. धमकी कोणत्या कारणावरून देण्यात आली हे अद्याप समजू शकले नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.









