मोठी बातमी..! नाशिक मध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड ; नामांकित हॉटेल मध्ये सापडले ५ कोटी, एका मोठ्या नेत्यासह गाडी जप्त

महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत आहे. त्यापूर्वीच नाशिक येथील एका नामांकित हाँटेलमधून पाच कोटींहून अधिकची रोकड जप्त करण्यात आली. या कारवाईत एका मोठ्या नेत्याची गाडीही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरु आहे. येत्या २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होईल. आज विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने अनेक मोठे नेते महाराष्ट्रात प्रचारसभा घेत आहेत. एकीकडे प्रचार शिगेला पोहोचला असताना, निवडणूक आयोगानेही डोळ्यात तेल घालत, राज्यभर कारवाया सुरु ठेवल्या आहेत. यातच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे.

नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये आज सकाळी कोट्यवधी रुपये सापडले. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. ही रक्कम पाच कोटीहून अधिक रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईत एका राजकीय पक्षाच्या नेत्याची गाडीही जप्त करण्यात आल्याचे समजते. नाशिकमधील या घडामोडीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाकडून आज सकाळच्या सुमारास या हॉटेलवर छापेमारी केली. यावेळी पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले. सध्या पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्या व्यक्तीची कसून चौकशी सुरु आहे. तसेच इतकी मोठी रक्कम कुठून आणि का आणली? हे पैसे कुणी दिले? कशासाठी दिले? यासारखे अनेक प्रश्न सध्या पोलिसांकडून केले जात आहेत.पोलिसांनी ताब्यात घेतलेला नेता कोणत्या राजकीय पक्षाचा आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.