
इतक्या रूपयांनी वाढले दर, खिशाला कात्री बसणार, या कारणामुळे दरवाढ?

दिल्ली – वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सर्वसामान्यांच्या खिशावर पुन्हा एकदा भार पडणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. CNG गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड म्हणजेच आयजीएलने सीएनजीची किंमत एक रुपयांवरून तीन रुपये केली आहे. दिल्लीत सीएनजीच्या किमतीत १ रुपयांची वाढ झाली आहे, तर इतर ठिकाणी ३ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच, जून २०२४ नंतर पहिल्यांदाच सीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या किमतीत झालेल्या या वाढीनंतर आता दिल्लीत सीएनजीची किंमत ७६.०९ रुपये झाली आहे आणि नोएडा-गाझियाबादमध्ये सीएनजी ८४.७० रुपये प्रति किलो झाली आहे. मुंबईत आज सीएनजी ७७ रुपये प्रति किलोवर विकले जात आहे. एक एप्रिलपासून सरकारने नैसर्गिक वायूचे दर ६.५० वरून ६.७५ डॉलर प्रति एमएमबीटीयू वाढवले आहेत. म्हणजेच सरकारने प्रति एमएमबीटीयू दरात ०.२५ टक्क्याने वाढ केली आहे. याबाबतची अधिसूचना पेट्रोलियम खात्यातील पेट्रोलियम प्लॅनिंग आणि ॲॅनालिसिस विभागाने काढली आहे. त्यामुळे दर वाढ होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे ही दरवाढ झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच नैसर्गिक वायूच्या मूळ दरात वाढ झाली आहे.
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सीएनजी कार खरेदीत वाढ झाली आहे. मात्र, आता सीएनजीच्या किंमतीतही वाढ झाल्याने वाहनधारकांना चांगलाच फटका बसणार आहे. सीएनजीच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट मात्र कोलमडणार आहे.









