भावकीच्या लोकांची तरुणाला शिवीगाळ करत मारण्याची धमकी ; संतापलेल्या तरुणाने व्हिडिओ बनवत केला आयुष्याचा शेवट

किरकोळ कारणावरून भावकीच्या लोकांनी शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली,असा आरोप करत एका २० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ही घटना नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील निळेगव्हाण या गावात घडली आहे. या तरुणाने व्हिडीओ तयार करुन आणि धमकी देणाऱ्यांचे नावे घेवून कुष्णूर येथील तलावात उडी मारुन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. श्याम यशवंत जाधव (वय-२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्याम जाधवने व्हिडिओ तयार करून काही लोकांवर आरोप केले आहेत. मला मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मी मारहाण सहन करू शकत नाही, म्हणून जीव द्यायला जात आहे, असं या व्हिडिओमध्ये त्याने म्हटलं आहे. तसेच या व्हिडिओमध्ये त्याने काही जणांची नावे घेतली असल्याने पोलीसांकडून त्या दृष्टीने तपास सुरु आहे.या घटनेबाबत कुटुंबीयांना माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच याप्रकरणी कुंटूर पोलीस तपास करत आहेत.