सावधान! तुमची मुले अनधिकृत शाळेत तर जात नाहीत ना?

पुणे – जर तुमचे मूल शाळेत जात असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. तुम्ही तुमच्या मुलाला घातलेली शाळा ही अधिकृत आहे की नाही हे तपासण्याची वेळ आता आली आहे. कारण पुणे जिल्ह्यात अनधिकृत शाळांचे पेव फुटले आहे. तसेच प्रशासनाने अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे.

नवीन शैक्षणिक वर्षातील खासगी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पालकांचा खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा आग्रह असतो. अनेकदा शाळा अनधिकृत की अधिकृत याची माहिती नसल्याने पालकांची फसवणूक होते. त्यानंतर शिक्षण विभागाकडून त्या शाळेवर कारवाई केल्यास मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आता शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांचा सर्वे केला असून यात १२ शाळा या अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे या शाळांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या शाळांची यादी जाहीर केली आहे. तसेच या शाळांवर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच या शाळांनी जाहिरात करणे बंद करावी. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान याबाबत बोलताना नाईकडे म्हणाले की, हवेली, मुळशी या तालुक्यात तसेच पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका भागात सुरू असलेल्या अनधिकृत शाळांच्या संदर्भात अधिकाऱ्यांना जबाबदारी निश्चित करण्यात आली असून नागरिकांच्या सोईसाठी प्रत्येक ठिकाणी पालकांना मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचेही नाईकडे म्हणाले आहेत.

या आहेत अनधिकृत शाळा

१) श्रीनाथ इंग्लिश मीडिअम स्कूल, वीर, पुरंदर
२) जिजस क्राईस्ट इंग्लिश मीडिअम स्कूल, कामशेत
३) किंग्ज वे पल्बीक स्कूल, लोणावळा
४) शिव समर्थ इंग्लिश मीडिअम स्कूल, जांभुळवाडी
५) एंजल इंग्लिश मीडिअम हायस्कूल गणेश नगर, दत्तवाडी नेरे
६) चाणक्य ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट
७) अंकुर इंग्लिश मीडिअम स्कूल, मारुंजी
८) पेरिविंकल इंग्लिश मीडिअम स्कूल, पिरंगुट
९) इलाईट इंटरनॅशनल स्कूल, कासारआंबोली
१०) संस्कार प्रायमरीस्कूल इंग्लिश मीडिअम स्कूल, पिरंगुट
११ ) दिल्ली पब्लिक स्कूल, हिंजवडी
१२ ) मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, मांजरी