ब्युटी पार्लरमध्ये प्रवेश करून महिलेस मारहाण, शिवीगाळ करत विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल

 शिरूरमधील स्टेट बँक कॉलनी येथे दारूच्या नशेत आलेल्या तरुणाने ब्युटी पार्लरमध्ये प्रवेश करून (४२ वर्षीय) महिलेला शिवीगाळ व मारहाण करून तुझे ब्युटी पार्लर जाळून टाकतो, अशी दमबाजी करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. महिलेच्या फिर्यादीवरून सतिश शिंदे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१२ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता शिरुरमधील स्टेट बँक काँलनी येथे ४२ वर्षीय महीला फिर्यादी त्यांच्याब्युटीपार्लरमध्ये काम करत असताना सतिश शिंदे हा दारुच्या नशेत तेथे आला व त्याने ब्युटी पार्लरचा दरवाजा जोरात वाजवीला. फिर्यादी दरवाजा उघडुन बाहेर आल्यानंतर त्याने फिर्यादीस तुझ्यामुळे आमच्या घरी भांडण होत आहे. असे बोल्त जोर-जोराने अश्लील अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन महिलेच्या टाँपची काँलर पकडुन हाताने पाठीवर व कानाखाली चापट मारुन, फिर्यादीला ‘पार्लर जाळुन टाकतो. तु या ठिकाणी कसा व्यवसाय करते? ते पाहतो.’ असे बोलत दमदाटी केली.

याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खेडकर करीत आहे.