सावधान! लोनवर फोन घेत आहात का? मग ही बातमी वाचा

Smart phone in chain with lock. Isolated on white with clipping path. Security, data protection and software lock theme

आरबीआय कडून नवीन नियम आणण्याची तयारी, ग्राहकांना धक्का बसणार, कर्ज देणाऱ्यांची ताकत वाढणार, नियम काय?

मुंबई – भारतात नागरिक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खासकरून मोबाईल फोनसारख्या वस्तू लहान वैयक्तिक कर्जांवर खरेदी करतात. पण त्यातील अनेकजण वेळेवर हप्ता भरत नाहीत. त्यामुळे कर्ज देणाऱ्या कंपनीचे मोठे नुकसान होते. पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एका नवीन आणणार आहे.

आरबीआय एक नवीन नियम आणत आहे, त्यानुसार जर एखाद्या ग्राहकाने हप्त्यावर खरेदी केलेल्या मोबाईल फोनचे कर्ज फेडले नाही, तर बँक त्याचा फोन रिमोटली लॉक करेल. यासाठी लवकरच परवानगी दिली जाऊ शकते. या नियमामुळे कर्ज देणाऱ्यांना दिलासा मिळणार असून कर्जदारांच्या अडचणी वाढणार आहेत. लॉक करण्यासाठी कर्जदारांच्या फोनमध्ये एक अॅप इन्स्टॉल केले जाणार आहे. कर्जदारांसोबत चर्चा केल्यानंतर आरबीआय पुढील काही दिवसांतच फोन लॉकिंगचे निर्देश देणार आहे. दरम्यान, २०२४ मध्ये होम क्रेडिट फायनान्सने केलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले की, मोबाईल फोनसारख्या एक तृतीयांशपेक्षा जास्त ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कर्जावर खरेदी केले जातात. टेलिकॉम नियामकाच्या मते, देशात १.१६ अब्जाहून अधिक मोबाइल कनेक्शन आहेत. रिझर्व्ह बँकेला दोन गोष्टी सुनिश्चित करायच्या आहेत, पहिली म्हणजे कर्ज देणारा फोन लॉक करून कर्जाचे पैसे वसूल करू शकतो आणि दुसरी म्हणजे ग्राहकांचा डेटाही सुरक्षित ठेवला जावा.

जर आरबीआयचा हा नियम लागू झाला तर बजाज फायनान्स, डीएमआय फायनान्स आणि चोलामंडलम फायनान्स सारख्या ग्राहकोपयोगी उत्पादनांसाठी कर्ज देणाऱ्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो, ज्यामुळे वसुलीची शक्यता वाढू शकते. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यावर काय निर्णय घेते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.