
या तालुक्यांचा होणार समावेश, काही ठिकाणी होतोय विरोध, बातमीचे नेमक सत्य काय?

पुणे – येत्या २६ जानेवारीला राज्य सरकार राज्यात नवीन २१ जिल्ह्यांची घोषणा होणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये दिल्या जात आहेत. तसेच सोशल मीडियावरही त्या व्हायरल होत असून त्यावर चर्चा केली जात आहे. पण आता तर बारामती कोल्ह्याचा नकाशा सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे याची चर्चा होत आहे.

नव्या जिल्ह्यांची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता सोशल मीडियावर बारामती जिल्हाचा आराखडा कसा असेल याचा फोटोच व्हायरल केला जात आहे. या फोटोत बारामती तालुक्याचा जिल्हा झाल्यास यामध्ये कोणत्या तालुक्यांचा समावेश केला आहे, हे दाखवण्यात आले आहे. बारामती जिल्ह्याच्या नकाशात बारामती, दौंड, शिरूर, भोर, पुरंदर, इंदापूर, फलटण, कोरेगाव या आठ तालुक्यांचा समावेश असल्याचे दाखविण्यात आले आहे. हा फोटो नेटकऱ्यांनी व्हॉटसॅपसह माध्यमावर व्हायरल केला जात आहे. याविषयी संबंधित सर्वच राजकीय नेत्यांची भूमिका दुहेरी आहे. काहीजण सकारात्मक व काही नकारात्मक आहेत. त्यामुळे याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान जिल्हा निर्मितीबाबतच्या निर्णयाच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिक आणि राजकीय नेत्यांकडून येणार आहेत. शासनाकडून अधिकृत घोषणा होण्यापर्यंत नागरिकांना उत्सुकतेने वाट पाहावी लागेल. पण २०१८ मध्ये राज्य सरकारने २२ नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव सादर केला होता, ज्यातील २१ जिल्ह्यांचा समावेश सध्याच्या प्रस्तावात करण्यात आला आहे.

अद्याप जिल्हा निर्मितीबाबत कोणताही नवीन प्रस्ताव तयार करून पाठवण्यात आला नाही. विविध जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की जिल्हा निर्मिती बाबत शासन स्तरावरून निर्णय होऊ शकतो, परंतु अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा, परिपत्रक, आदेश नाहीत.









